येथे एका मुलीचे अपहरण करून तिच्यावर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना संभलहेरा येथील शेतात घडली, असे पोलिसांनी सांगितले. या मुलीला १ फेब्रुवारीला पळवून नेण्यात आले व नंतर शेतमालकासह चार जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. सनोज, मोनू, शेतमालक जिंदर कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौथ्या आरोपीची ओळख पटलेली नाही. सदर मुलीच्या कुटुंबीयांनी असा आरोप केला की, वरिष्ठ पोलिस अधीक्षकांच्या हस्तक्षेपानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली. पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याने आपल्याला वरिष्ठ पोलिस अधीक्षक एच.एन.सिंग यांच्याकडे दाद मागितली होती. दुसऱ्या एका बलात्कार प्रकरणातील फरारी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याने ताडेदा येथे सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला होता.
एकाची आत्महत्या
कल्याणपुपी येथे एका २५ वर्षीय युवकाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सुनीलकुमार असे त्याचे नाव असून त्याचे शवविच्छेदन करण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.