उत्तर भारतात उष्णतेची लाट आली असून राजस्थान व दिल्लीत आज मोसमातला आतापर्यंतचा उष्ण दिवस होता. राजधानीत कमाल तापमान ४२.७ अंश सेल्सियस होते तर किमान तापमान २४.५ अंश सेल्सियस होते. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आद्र्रता १२ ते ४७ टक्के होती. राजस्थानात जोधपूर जिल्ह्य़ातील फालोदी येथे ४७ अंश तापमानाची नोंद झाली. राजस्थानात उष्णतेची तीव्र लाट आहे. राजस्थानात ४०.४ ते ४७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद अनेक शहरात झाली आहे. जयपूरचे तापमान ४३.७ अंश होते. चुरू, बिकानेर, श्रीगंगानगर, जैसलमेर, बारमेर येथे धुळीचे वादळही होते. चुरू येथे ४५.४, कोटात ४३.८, बिकानेर व श्रीगंगानगर प्रत्येकी ४४.३ तर पिलानी ४३.५ व जोधपूर ४२.९ अंश या प्रमाणे तापमान होते.