भारतीय बनावटीच्या नव्या ‘इंटरसेप्टल’ क्षेपणास्त्राची रविवारी यशस्वी चाचणी घेण्यात आली. मोठ्या पल्ल्याच्या क्षेपणास्त्राला निकामी करण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात आहे.
बालासोरपासून १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या व्हिलर द्वीपजवळच्या नौदलाच्या लढाऊ जहाजावरुन याचे प्रक्षेपण करण्यात आले. डीआरडीओने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी इंटरसेप्टल मिसाईलने आपले लक्ष्य अचूक भेदले. मिसाईलची चाचणी यशस्वी झाली तसेच मिसाईलने आपले लक्ष्य अचूक भेदले असल्याची माहिती संरक्षण संशोधन व विकास संस्थे( डीआरडीओ)चे प्रवक्ते रवी कुमार गुप्ता यांनी दिली. याआधी डीआरडीओकडून या प्रकारातील सहा मिसाईलची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. १०० किलोमीटरपेक्षा अधिक उंचीवर असलेल्या लक्ष्याला भेदणारे क्षेपणास्त्र तयार करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सूत्रांनी यावेळी सांगितले.