सोशल नेटवर्कींग साईटवर सीआयए, एफबीआय, नासा यांसारख्या लोकप्रिय सरकारी वेबसाईटला मागे टाकत भारतीय सेना ही वेबसाईट फेसबुक रँकिंगमध्ये अव्वल ठरली आहे. ‘पीपल टॉकिंग अबाउट दॅट'(PTAT) रँकिंगमध्ये भारतीय लष्कराच्या फेसबुक पेजला दुसऱ्यांदा पहिले स्थान मिळाले आहे.
फेसबुकवर ‘पीपल टॉकींग अबाऊट दॅट’ या रँकिंगमध्ये भारतीय सेनेच फेसबुक पेज अव्वल आहे. भारतीय सेनेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, आमच्या सोशल मीडीयासाठी ही अभिमानाची गोष्ट असून, दोन महिन्यांपूर्वीच आम्ही फेसबुक या सोशल मीडीयावर अव्वल स्थान पटकावले. केवळ फेसबुक पेजच नव्हेच तर भारतीय सेनेच्या अधिकृत वेबसाईटलाही दर आठवडय़ाला २५ हजारांपेक्षा अधिक लाइक मिळत आहेत. १ जून २०१३ ला सुरु केलेल्या भारतीय लष्कराच्या या फेसबुक अकाऊंट  ३० लाखांपेक्षा अधिक लाईक मिळालेले आहेत. भारतीय लष्कराचे ट्विटरवरील फॉलोअर्स देखील साडेचार लाखांपेक्षाही अधिक आहेत.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात सीमारेषेवर तर युद्ध सुरु असतेच पण फेसबुकवर देखील हीच परिस्थिती दिसतेय. भारत-पाक या दोन्ही देशात जिओ लोकेशनद्वारे एकमेकांचे फेसबुक पेज ब्लॉक केले आहेत. त्यामुळे पाकिस्तानमधील व्यक्ती भारतीय लष्कराचे फेसबुक पेज पाहू शकत नाही तसेच भारतातील व्यक्ती पाकिस्तान लष्कराचे फेसबुक पेज पाहू शकत नाही.