इसिस या दहशतवादी संघटनेने तीव्र संघर्ष करताना सीरियातील अलेप्पो शहरापर्यंत आगेकूच केल्याची माहिती निरीक्षकांनी दिली आहे.
सीरियातील सैनिक आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या कारवाईत २४ जण मारले गेल्याची माहिती सीरियातील मानव हक्क निरीक्षक रामी आब्देल रहमान यांनी सांगितले. इसिस दहशतवादी आणि स्थानिक बंडखोर यांच्यात जोरदार गोळीबार झाला. इसिस दहशतवादी अलेप्पो शहरापासून दूर असले तरी त्यांनी मोठी मजल मारली आहे, असे रहमान म्हणाले.
सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असाद यांच्या राजवटीला विरोध करण्यासाठी इसिसकडून सातत्याने सशस्त्र हल्ले करण्यात येत आहेत. सैनिक, बंडखोर, कट्टरपंथीय आणि कुर्दिश सैनिक यांच्यात सातत्याने वाद होत आहेत.