भाषणासाठी पुरेसा वेळ न दिल्यामुळे तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी, दिल्लीत सुरू असलेल्या ५७ व्या राष्ट्रीय विकास परिषदेतून काढता पाय पाय घेतला.  
पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली विज्ञान भवन येथे सुरू असलेल्या बैठकीवर बहिष्कार टाकत जयललिता बाहेर पडल्या. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचं भाषण सुरू असताना, दहा मिनिटांनी समयसूचकतेची घंटा वाजली. त्यावेळी जयललिता याचं एक तृतियांश भाषण झालं होतं. त्यामुळे त्यांनी भाषणासाठी अतिरिक्त वेळ मागितली. मात्र त्यांची ही मागणी अमान्य करण्यात आल्याने नाराज झालेल्या जयललिता यानी बैठकीतून बाहेर पडणे पसंत केले. बाहेर पडल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जयललिता यांनी हा आपला मोठा अपमान असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
देशातील महिलांची सुरक्षितता आणि त्यांच्या हक्कांचं संरक्षण करणं, हे आमचं प्राधान्य असल्याची ग्वाही, पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या परिषदेत दिली. तसेच महिलांची सुरक्षा मजबूत व्हावी यासाठी कायद्यात बदल करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असंही पंतप्रधानांनी आपल्या भाषणामध्ये नमूद केलं.