लालूप्रसाद यांना उद्देशून ‘सैतान’ म्हटल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध राष्ट्रीय जनता दलाने शुक्रवारी निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली, तर लालूप्रसाद यांनी मोदी यांच्यासाठी ‘ब्रह्मपिशाच्च’ (महासैतान) असे संबोधन वापरले.

मोदी यांनी आपले पक्षप्रमुख तसेच त्यांची जात याविरुद्ध अपमानास्पद व अप्रतिष्ठा करणारी भाषा वापरल्याचा आरोप राजदने निवडणूक आयोगाला सोपवलेल्या तक्रारीत केला आणि मोदी यांना यापुढे राज्यात सभांमध्ये भाषणे करण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी केली. मी जर ‘सैतान’ असेल, तर ते (मोदी) ‘ब्रह्मपिशाच्च’ आहेत, असे लालूप्रसाद यांनी अन्यत्र बोलताना सांगितले. लालूप्रसादयांनी या वादाचा संबंध राज्याच्या आणि विशेषत: मागासवर्गीयांच्या प्रतिष्ठेशी जोडला. त्यांनी मोदी यांना जाहीररीत्या राजकीय वादविवाद करण्याचेही आव्हान दिले.