त्रिपुरामध्ये डाव्यांना स्पष्ट बहुमत, मेघालयात कॉंग्रेस सत्तेकडे

त्रिपुराचा गढ राखण्यात डाव्या आघाडीला यश मिळाले असून, मेघालयामध्ये कॉंग्रेस आणि नागालॅंडमध्ये नागा पीपल्स

आगरताळा | February 28, 2013 05:26 am

त्रिपुराचा गढ राखण्यात डाव्या आघाडीला यश मिळाले असून, मेघालयामध्ये कॉंग्रेस आणि नागालॅंडमध्ये नागा पीपल्स फ्रंट या पक्षांनी सत्तास्थापनेच्या दिशेने वाटचाल केली आहे. 
त्रिपुरामध्ये विधानसभेच्या ६० जागांपैकी निकाल जाहीर झालेल्या ५९ जागांमध्ये ४९ जागांवर डाव्या पक्षांना विजय मिळाला आहे. कॉंग्रेसचे उमेदवार दहा जागांवर विजयी झाली आहेत.
नागालॅंडमधील विधानसभेच्या ६० जागांपैकी ५१ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. पैकी ३४ जागांवर नागालॅंड पीपल्स फ्रंटला विजय मिळाला आहे. कॉंग्रेसचे उमेदवार पाच जागांवर विजयी झाले असून, भारतीय जनता पक्षाचा एक, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार उमेदवार विजयी झालेत. चार अपक्ष आणि संयुक्त जनता दलाचा एक उमेदवारही निवडणुकीत यशस्वी झाला आहे.
मेघालयमध्ये एकूण ६० जागांपैकी ५४ जागांचे निकाल जाहीर झाले असून, त्यापैकी २९ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत.

First Published on February 28, 2013 5:26 am

Web Title: left fronts retains tripura ruling parties ahead in meghalaya nagaland