आधी ‘मेक इंडिया’करा म्हणजे, आपोआपच ‘मेक इन इंडिया’ घडून येईल, अशी कोपरखळी ट्विटरच्या माध्यमातून लगावत दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पंतप्रधानांवर शरसंधान केले.
गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टीने देशांतर्गत उद्योजकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’, असे आवाहन केले होते. ती संकल्पना पकडून मेकिंग इंडियाशिवाय ‘मेक इन इंडिया’ हे ध्येय साध्य होऊ शकत नाही, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. मेक इंडियासाठी आधी आरोग्य, शिक्षण, पाणी आणि इतर नागरी सुविधांवर भर द्यावा लागेल. नागरिकच आपला मुख्य ठेवा आहेत. त्यांच्यासाठी गुंतवणूक केल्यास जग आपले अनुकरण करेल. म्हणजे, खऱ्या अर्थाने आपण ‘मेक इन इंडिया’ होऊ शकेल.
‘मेक इंडिया’च्या निर्मितीसाठी लोकहिताय वीज धोरण अंमलात आणण्याला प्रथम प्राधान्य दिले जाईल. प्रामाणिक सरकारपुढे विजेच्या संदर्भातील बहुतेक शंकांचे निरसन झाल्याचे केजरीवाल यांनी ट्विट केले. केजरीवाल यांनी आप कार्यकर्त्यांना डेंग्यूला अटकाव करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले.