अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा

शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास दिल्ली न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा ठोठावली असून

पीटीआय, नवी दिल्ली | February 8, 2013 05:58 am

शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास दिल्ली न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा ठोठावली असून पीडितेच्या पुनर्वसनासाठी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत.
अतिरिक्त सत्र न्यायमूर्ती कामिनी लव यांनी केशवपूरम येथील रहिवासी सूर्यभान याला कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सूर्यभानचे कृत्य क्षमा करण्यास योग्य नसल्याने त्याला कोणतीही दयामाया दाखविण्यात येणार नाही, असे न्यायमूर्तीनी म्हटले आहे.
पीडितेची अपरिपक्वता, घरात कोणीही नसल्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने केलेले कृत्य पाहता त्याच्यावर कोणतीही दयामाया करण्यात अर्थ नाही. लहान मुलींवर अशा प्रकारे लैंगिक अत्याचार होण्याच्या घटना वाढत असल्याबद्दल न्यायमूर्तीनी चिंता व्यक्त केली.
ही बाब राष्ट्रीय पातळीवरील चिंतेचा विषय असून अशा प्रकारे अल्पवयीन मुलींचे सर्व प्रकारच्या अत्याचारांपासून संरक्षण करणे न्यायालयाचे आद्य कर्तव्य आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

First Published on February 8, 2013 5:58 am

Web Title: man gets 10 yr term for raping 5 yr old girl
टॅग: Rap