लोकसभेची निवडणूक सप्टेंबरमध्येच होण्याची शक्यता – मुलायमसिंह

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लोकसभेची निवडणूक होण्याची शक्यता समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यांनी वर्तविली आहे.

लखनौ | February 4, 2013 06:07 am

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लोकसभेची निवडणूक होण्याची शक्यता समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यांनी वर्तविली आहे. आपल्या कार्यकर्त्यांना मुदतपूर्व निवडणुकांसाठी तयार राहण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २१ फेब्रुवारीपासून सुरू होते आहे. २६ फेब्रुवारीला रेल्वे आणि २८ फेब्रुवारीला सर्वसाधारण अर्थसंकल्प लोकसभेत मांडण्यात येईल. हे अधिवेशन संपल्यावर सत्ताधारी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार राष्ट्रपतींकडे राजीनामा देऊन मुदतपूर्व निवडणूक घेण्याची मागणी करण्याची दाट शक्यता असल्याचे मुलायमसिंह यांनी म्हटले आहे. सप्टेंबरमध्येच लोकसभेची निवडणूक होईल, असाही अंदाज त्यांनी वर्तविला आहे.
मतदार याद्यांकडे अद्ययावत आहे की नाही, हे तपासा. सामान्य नागरिकांच्या संपर्कात राहून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करा, असेही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले.

First Published on February 4, 2013 6:07 am

Web Title: mulayam singh hints at early loksabha polls