देशाच्या लोकसंख्येत हिंदूंची टक्केवारी घटत चाललेली पाहून हिंदू स्त्रियांनी चार किंवा अधिक मुलांना जन्म द्यावा, असे आवाहन करणाऱ्या हिंदू नेत्यांपाठोपाठ आता मुस्लिमांनाही तसेच आवाहन करण्यात आले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये मुस्लिमांच्या संख्येत होत असलेली घट रोखण्यासाठी आर्थिकदृष्टय़ा सक्षम मुस्लिमांनी एकाहून अधिक लग्ने करून शक्य तितक्या मुलांना जन्म द्यावा, असे आवाहन मुस्लीम-दीनीमहज या पक्षाचा नेता मोहम्मद कासीम याने केले आहे. कासीम खुनाच्या आरोपात तुरुंगात असून जन्मठेप भोगत आहे.