भारतीय वंशाच्या वैज्ञानिकांनी अवकाशातील मानवी विष्ठेचे रूपांतर ऊर्जेत करून ती पुन्हा नासाचे यान चंद्रावरून पृथ्वीवर आणण्याची कल्पना मांडली आहे. या प्रक्रियेचे पृथ्वीवरही अनेक उपयोग आहेत, असे फ्लोरिडा विद्यापीठाचे कृषी व जैव अभियांत्रिकी विभागाचे प्रकाश पुलामनपल्लील यांनी सांगितले. त्याचा वापर एखाद्या परिसरात किंवा कुठेही विष्ठेचा वापर इंधन करण्यासाठी करता येईल.
२००६ मध्ये नासाने चंद्रावर वस्ती करण्यासाठी योजना आखली, ती २०१९ ते २०२४ या काळात पूर्णत्वास जाणे अपेक्षित आहे. नासाचा चंद्राच्या बाबतीत हेतू अवकाशयानाचे वजन कमी करणे हा आहे. अवकाशयात्रेच्या वेळी ती विष्ठा कंटेनरमध्ये भरून ती स्पेस कार्गोत भरून जाळून टाकली जाते व पृथ्वीच्या वातावरणात सोडून दिली जाते पण फार मोठय़ा अंतराच्या मोहिमांमध्ये मात्र तसे करता येत नाही. चांद्र मोहिमेत मानवी विष्ठा पृथ्वीवर आणणे शक्य नाही तसेच तेथे उघडय़ावर बसून तेथील परिसर खराब करणेही योग्य नाही. त्यामुळे पुलामनपल्लील व पदवीधर विद्यार्थी अभिषेक ढोबळे यांनी हे आव्हान स्वीकारले आहे.
 पुलामनपल्लील यांनी सांगितले, की मानवी विष्ठेतून, न खाल्लेल्या अन्नातून व फूड पॅकेजिंगमधून किती मिथेन तयार करता येईल याचा विचार आम्ही करीत आहोत. पृथ्वीवरून इंधन जास्त नेण्यापेक्षा तिथे इंधन तयार करून चंद्रावरून पृथ्वीकडे येता येईल असे आम्हाला वाटते. मिथेनचा वापर अग्निबाणाचे इंधन म्हणून करता येतो, त्यामुळे चंद्रावरून परत येण्यासाठी त्याचा उपयोग होईल.
नासाने फ्लोरिडा विद्यापीठाला मानवी विष्ठा पॅकेज स्वरूपात द्यायला सुरवात केली आहे.  इतर पॅकेजिंग पदार्थ द्यायला सुरुवात केली आहे. पुलामनपल्लील व ढोबळे यांनी इलिनॉइस विद्यापीठात मानवी विष्ठेपासून मिथेन किती चटकन तयार करता येईल याचा विचार करीत आहेत. डायजेस्टर प्रक्रियेत सेंद्रिय द्रव्य मानवी विष्ठेतून वेगळे काढले जाते, त्यात २०० गॅलन अपेय पाणी वर्षांला तयार होते. इलेक्ट्रोलिसिस पद्धतीने हायड्रोजन व ऑक्सिजन वेगळा काढला जातो. त्यामुळे अवकाशवीरांना ऑक्सिजन बॅक अप सिस्टीम म्हणून वापरता येतो. जर्नल अॅडव्हान्सेस इन स्पेस रीसर्च या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
मानवी विष्ठेपासून अग्निबाणाचे इंधन
मिथेन तयार करण्यासाठी अॅनेरोबिक डायजेस्टरचा वापर केला जातो, त्यात जंतू मारले जातात व मानवी विष्ठेचे रूपांतर बायोगॅसमध्ये म्हणजे मिथेन व कार्बन डायॉक्साइडच्या मिश्रणात केले जाते. त्यातून दिवसाला २९० लिटर मिथेन तयार करता येतो. शिवाय त्याचा वापर वीज, तापवणे, विद्युत निर्मिती यासाठीही करता येतो. मिथेन हे अग्निबाणाचे इंधन असते त्यामुळे चंद्रावरून परत येताना त्याचा वापर करता येईल.