आपल्या गाडीतून शस्त्रे, दारूगोळा आणि सुमारे एक कोटी दहा लाखांची रोकड घेऊन निघालेले नागालॅंडचे गृहमंत्री इमकॉंग इमचेन यांना सोमवारी वोखा जिल्ह्यात अटक करण्यात आली.
इमचेन हे कोहिमामधून आपला मतदारसंघ असलेल्या कोरिडांगाकडे चालले होते. त्याचवेळी आसाम रायफल्सचे अधिकारी वोखा जिल्ह्यात गाड्यांची तपासणी करीत असताना त्यांना इमचेन यांच्या गाडीमध्ये शस्त्रे, दारुगोळा, रोकड आणि दारू सापडल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर इमचेन यांना ताब्यात घेण्यात आले आणि नंतर त्यांना जिल्हा पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले.
नागालॅंड पीपल्स फ्रंटचे उमेदवार असून, मोकोकचुंग जिल्ह्याचे ते प्रचारप्रमुखही आहेत. या जिल्ह्यामध्ये नागालॅंड पीपल्स पार्टीने दहा उमेदवार उभे केले आहेत.