निवडणुका येतील त्यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या राजकीय पक्षाला टीम अण्णा पाठिंबा देण्याची शक्यता आहे असे नवीन टीम अण्णाच्या सदस्या किरण बेदी यांनी सांगितले.

इंडियन स्कूल ऑफ बिझीनेस या संस्थेची नेतृत्व शिखर बैठक 2013 मध्ये किरण बेदी यांनी सांगितले की, आम्ही प्रामाणिकतेला महत्त्व देतो. केजरीवाल यांनी एकूणच एकनिष्ठता दाखवली आहे त्यामुळे ते पाठिंब्यास पात्र आहेत.

टीम अण्णाचे केजरीवाल यांच्याशी कुठलेही मतभेद नाहीत असे सांगून त्या म्हणाल्या की, ते निवडणुकीच्य मार्गाने जाऊ इच्छितात व व आम्ही अराजकीय मार्ग निवडला आहे. निवडणुकीच्या मार्गाने जाण्यासाठी हीच योग्य वेळ आहे असे केजरीवाल यांना वाटते.

पंतप्रधानांना संरक्षण, परदेशी व्यापार व कायदा व सुव्यवस्था या मुद्दय़ांसंबंधात जनलोकपाल विधेयकाच्या कक्षेबाहेर ठेवण्याच्या मुद्दय़ावर विचारले असता त्या म्हणाल्या की, हा प्रश्ऱना वादचर्चेचा आहे. समितीच्या शिफारशींची आम्ही वाट पाहात आहोत. स्वतंत्र सीबीआय हा शिफारशीतील नवीन मुद्दा आहे. सीबीआय संचालकांनी लोकपालांना जबाबदार असावे की नाही असा एक मुद्दा त्यात आहे. राज्यांच्या लोकपाल निर्मितीचा संबंध हा केंद्रीय विधेयकांशी असू नये अशा अनेक शिफारशी करणारा निवड समितीचा अहवाल नुकताच राज्यसभेत मांडण्यात आला आहे. गेल्या वर्षी लोकसभेत संमत झालेल्या वादग्रस्त विधेयकाला राज्यसभेत विरोधी पक्षांनी आडकाठी केली, त्या विधेयकात राज्यांनी लोकायुक्त नेमणे अनिवार्य आहे.