जगविख्यात चित्रकार लिओनादरे दा विंची याने मोनालिसाचे अधिक तरुणपणीचे आणखी एक चित्र काढल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.
लिओनादरेने काढलेल्या मोनालिसाच्या एकमेव अद्वितीय चित्राने अवघ्या जगभरातील कलाप्रेमींना मंत्रमुग्ध केले. मात्र मोनालिसाचे हे एकमेव चित्र असल्याच्या दाव्याला छेद देणारे संशोधन स्वित्र्झलड येथील आर्ट फाऊंडेशनने करून लिओनादरेने जगप्रसिद्ध मोनालिसा चित्राच्या आधी म्हणजे पंधराव्या शतकातच तरुण मोनालिसाचे आणखी एक चित्र चितारल्याचे म्हटले आहे.
गेल्या वर्षी जिनिवा येथे अचानक मोनालिसाचे एक चित्र प्रदर्शित करण्यात आले. मात्र या चित्रातील मोनालिसा ही खूपच तरुण दिसत असून ते चित्र सध्या प्रसिद्ध असलेल्या मोनालिसाच्या चित्रापेक्षा अधिक जुने असल्याचे दिसून आले. या नव्याने समोर आलेल्या चित्राबद्दल अनेक संशोधकांनी संशय व्यक्त केला होता. मात्र या चित्राच्या शास्रोक्त पद्धतीने केलेल्या तपासणीमुळे या नवीन मोनालिसाच्या चित्राचे सत्य समोर आल्याचे फाऊंडेशनने म्हटले आहे.
झुरिच इन्स्टीटय़ूटने लिओनादरेच्या चित्रावर केलेल्या काही चाचण्यांमुळे ते चित्र साधारणत १४१० ते १४५५ या काळात काढल्याचे स्पष्ट करीत हे नवीन चित्र सोळाव्या शतकातील असल्याचा दावा चुकीचा असल्याचे आर्ट फाऊंडेशनने म्हटले आहे.