अणुयुद्धाच्या धमकीमुळे काश्मीरचा प्रश्न सुटेल, अशी कल्पना करणे चुकीचे असून, काश्मीर हा कधीही पाकिस्तानचा भाग होऊ शकणार नाही, असे स्पष्ट मत नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान या दोघांसाठीही मुख्य विषय राहिलेला आहे. त्यामुळे दोन देशांमधील संवाद हाच पुढे जाण्याचा सगळ्यात योग्य मार्ग आहे. युद्धाची किंवा अणुबॉम्ब वापरण्याची धमकी दिल्यामुळे प्रश्न सुटणार नाहीच. समझोत्याच्या एका टप्प्यावर येण्यासाठी आपल्याला मार्ग आणि उपाय शोधून काढावे लागतील. तरीही कुठल्याही देशाला कितीही वाटले तरी सीमा बदलणार नाहीत.