भारतासमवेत अलीकडेच झालेल्या तणावाच्या पाश्र्वभूमीवर पाकिस्तानने आपल्या लष्करी कवायती सुरू केल्या आहेत. लढाऊ जेट विमानांच्या उड्डाणांचा सराव तसेच भूदळाच्या सैनिकांच्या नियमित कवायती सुरू असून देशाचे ऐक्य आणि सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी हे आवश्यक असल्याचा दावा वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने केला. पाकिस्तानचे हवाई दल सराव करीत आहे.
सध्याचे जागतिक व राजकीय स्तरावरील एकूण गुंतागुंतीचे वातावरण तसेच अन्य धोका लक्षात घेता विद्यमान परिस्थिती अधिक आव्हानात्मक असून आम्हाला अंतर्गत तसेच बाह्य़ शक्तींपासूनही धोका असल्याचे जन. खलीद शर्मीन वायमन यांनी सांगितले.
वायमन हे पाकिस्तानच्या लष्करातील सर्वात ज्येष्ठ असे दुसऱ्या क्रमांकाचे लष्करी अधिकारी म्हणून ओळखले जातात. अशा प्रकारच्या सरावांमुळे पाकिस्तानची लष्करी सज्जता लक्षणीयरीत्या वाढेल, असा दावा वायन यांनी केला.