पंतप्रधान मनमोहन सिह यांनी इंधनामध्ये भाववाढ आणि सबसिडीमध्ये कपातीचे संकेत आज (गुरूवार) आज दिले. सध्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्याचे सांगत १२ व्या पंचवर्षिक योजनेमध्ये आठ टक्के वाढीच्या कपातीचे लक्ष पूर्ण करण्यासाठी पेट्रोलियम पदार्थांचे भाव वाढवण्याची आणि सबसिडीमध्ये कपात करण्याचे कठोर निर्णय घेतले जाऊ शकतात असे संकेत मनमोहन सिंग यांनी दिले आहेत. विज्ञान भवन येथे आयोजित ५७ व्या राष्ट्रीय विकास परिषद – एनडीसी – च्या उद्घाटनप्रसंगी  पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आठ टक्के आर्थिक विकासाचे लक्षही महत्वाकाक्षी असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले कि, जुन्या मार्गाने जाऊन कोणतेही काम होणार नाही. देशात इंधनाचे भाव खूपच कमी आहेत, यामध्ये हळू हळू संशोधन करावे लागेल.
बारावी पंचवार्षिक योजनेच्या (२०१२ ते २०१७) सर्वात प्रथम ८.२ टक्के विकासाचे लक्ष ठेवण्यात आले होते. जागतिक मंदी आणि कौटुंबिक अर्खव्यवस्थेमध्ये आलेल्या नरमाईचा विचार करता योजना आयोगाने यामध्ये सुधार करत ८ टक्के विकासावर आपले लक्ष केंद्रीत केले आहे.  
पंतप्रधानांनी वीज आणि पाणी ही दोन क्षेत्रे अर्थव्यवस्थेसाठी महत्वाची असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले कि, आमचे पहिले लक्ष अर्थवय्वस्थेमध्ये आलेली मरगळ नष्ट करून त्याला पुन्हा विकासाच्या मार्गाने नेण्याची असले पाहिजे.  
आपण जागतिक अर्थव्यवस्थेला बदलू शकत नाही. मात्र, आपल्या देशातील समस्यां सोडवण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो, असंही पंतप्रधान म्हणाले.
मनमोहन सिंग यांनी आर्थिक विकासाचा जोर वाढवण्यावर भर दिला पाहिजे सांगत आर्थिक विकास वाढवण्यासाठी आपला मूळ उद्देश ‘आम आदमी’ च्या   जीवनात सुधारणा करण्याचा असला पाहिजे, असं म्हणाले. सरकार यासाठी सर्वसमावेशक विकासावर भर देत आहे, असंही ते पुढे म्हणाले.