भविष्य निर्वाह निधीवरील व्याजाचा दर साडेआठ टक्के करण्याचा प्रस्ताव सध्या सरकारच्या विचाराधीन आहे. सन २०१२-१३ या चालू वित्तीय वर्षांत कर्मचारी भविष्य निर्वाह योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजात अर्धा टक्का वाढ झाल्यास त्याचा फायदा सुमारे पाच कोटी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
यापूर्वी भविष्य निर्वाह निधीवर सव्वाआठ टक्के व्याज दिले जात होते. वित्तीय आणि गुंतवणूक समितीच्या १४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आगामी बैठकीसमोर साडेआठ टक्के व्याज देण्याविषयक प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.