प्रतिस्पर्धी महाआघाडीच्या मागणीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बिहारमधील निवडणूक प्रचारसभांच्या थेट प्रक्षेपणावर बंदी घालू नये, असे आवाहन भाजपने निवडणूक आयोगाला केले आहे.काही पक्षांनी अशी मागणी केली असली, तरी सभांचे थेट प्रक्षेपण बंद केले जाणार नाही असे आश्वासन आयोगाने आम्हाला दिले, असा दावा केंद्रीय मंत्री व पक्षाचे ज्येष्ठ नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी केला. पक्षाच्या एका शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट गेतली. अशाप्रकारे थेट प्रक्षेपणावर बंदी घातली, तर ज्या मतदारसंघांमध्ये अद्याप निवडणुका व्हायच्या आहेत, तेथील मतदारांना पक्षाच्या निवडणूक मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या वरिष्ठ नेत्याचे विचार ऐकता येणार नाहीत, असे शिष्टमंडळाने आयोगाला सांगितल्याचे नक्वी म्हणाले.