केंद्र सरकारचे सॉलिसिटर जनरल रोहिंटन एफ. नरीमन यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. केंद्रीय कायदामंत्री अश्वनीकुमार यांच्या काही निर्णयांबद्दल नरीमन हे नाराज होते. त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे.
केंद्र सरकारने २३ जुलै २०११ रोजी नरीमन यांची सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती केली होती. त्याआधीचे सॉलिसिटर जनरल गोपाळ सुब्रमण्यम यांनी २जी गैरव्यवहारातील केंद्र सरकारच्या भूमिकेविरोधात नाराजी व्यक्त करीत पदाचा राजीनामा दिला होता.