महिलांवरील बलात्कार आणि अत्याचाराच्याविरोधात जागृती करण्यासाठी जमिनीत समाधी लावण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका नागा साधूला शुक्रवारी प्रशासकीय अधिकाऱयांनी रोखले. समाधीसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यातून अधिकाऱयांनी आणि पोलिसांनी बळजबरीने बाहेर काढले.
अलाहाबादमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यात स्वामी श्यामानंद सरस्वती यांनी महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात समाधी घेण्याचे जाहीर केले होते. त्यासाठी नऊ बाय नऊ फुटांचा खड्डाही खोदण्यात आला होता आणि त्यामध्ये चिखल भरण्यात आला होता. शुक्रवारी नित्यपूजा केल्यानंतर हा साधू त्या खड्ड्यात नऊ दिवस समाधी लावणार होता. समाधी घेतल्यानंतर खड्ड्यात पुन्हा माती टाकावी, असेही त्याने आपल्या शिष्यांना सांगून ठेवले होते. पोलिसांनी शुक्रवारी त्याला समाधी लावण्याअगोदरच ताब्यात घेतले.
वृंदावर आणि हरिद्वारमध्ये याआधी तब्बल ११वेळा आपण समाधी लावली असल्याचा दावा श्यामानंद सरस्वती यांनी केला आहे.