आपल्या विश्वाची रचना ही मानवी मेंदू व इंटरनेट यांच्यासारखीच आहे असे एका नव्या संशोधनात दिसून आले आहे. विश्वाची रचना व ते ज्या नियमांच्या आधारे अस्तित्वात आले यात पूर्वी वाटत होते त्यापेक्षा मानवी मेंदूचा विकास व इंटरनेटशी अधिक साम्य आहे असे दिसून आले आहे.
सॅनदियागो येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी यावर संशोधन केले असून, सहलेखक दिमित्री क्रिओकोव यांनी सांगितले, की विश्व हे जागतिक मेंदू किंवा संगणक आहे असा दावा आम्ही करणार नाही, परंतु विश्वाची वाढ व गुंतागुंतीच्या रचना यातून ज्या नियमांच्या आधारे त्यांची निर्मिती झाली त्यात फारसा फरक नाही. विश्व, संगणक किंवा इंटरनेट कुठल्या नियमांच्या आधारे काम करते हे शोधून काढणे हे विज्ञानासमोरील एक मोठे आव्हान मानले जाते. रचनात्मक व गतिकीय साम्ये ही नियमांच्या संदर्भातील आहेत या नियमांचे मूळ जरी अजूनही चकवा देत असले तरी त्यातील साम्य नाकारता येत नाही. अतिशय गुंतागुंतीच्या महासंगणकीय प्रक्रियांमधून तयार करण्यात आलेली विश्वाच्या रचनेशी साम्य असणारी प्रारूपे ही अवकाश व काळ यांच्या नकाशाच्या रूपात दाखवली तर त्यात व इंटरनेटच्या अनेक गुंतागुंतीच्या रचनांमध्ये साम्य दिसून येते. नेटवर्क सायन्स व विश्वरचनाशास्त्र यांच्याविषयी मानवाला असलेल्या ज्ञानात यामुळे भर पडणार आहे. क्रियोकोव यांनी म्हटले आहे, की अतिशय गुंतागुंतीच्या रचनांच्या व तात्पुरत्या रचनांच्या वाढीचे गतिकीय नियम सारखेच असतात व त्यातून आपल्याला त्यांच्यातील रचना साम्याचे स्पष्टीकरण देता येते. आंतरविद्याशाखीय संशोधनाचे हे आदर्श उदाहरण असून त्यात गणित, भौतिकशास्त्र, संगणक विज्ञान यांचा अनपेक्षित मार्गानी वापर करण्यात आला आहे.आपल्या विश्वाच्या अवकाश-काळ यावर आधारित चार मिती या पुंज पोकळीतून तयार झाल्या. त्याचा संबंध इंटरनेटच्या रचनेशी असू शकतो असे कुणाला तरी कल्पनेत वाटले असते काय, असा सवाल सॅनडियागो येथील महासंगणक केंद्राचे संचालक मायकेल नॉर्मन यांनी केला आहे. विश्वाच्या रचनेचे जाळे हे खगोलशास्त्रीय दृष्टीने फार मोठे आहे. खरेतर ते अनंत आहे, पण त्याला काही मर्यादा असत्या तरी ते अवकाश व काळाच्या १०२५० अणूंपेक्षा लहान नसते, असा संशोधकांचा अंदाज आहे.

how to choose healthy breakfast health expert told
७० टक्क्यांपेक्षा जास्त भारतीयांच्या नाश्त्यात पौष्टिकतेचा अभाव; पौष्टिक नाश्ता कसा निवडावा? आहारतज्ज्ञ सांगतात…
Human evolution explained
विश्लेषण: केसांमधील उवांचा आणि माणसाच्या अंग झाकण्याचा काय संबंध? उत्क्रांतीचा इतिहास व नवे संशोधन काय सांगते?
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान
documentry article lokrang marathi news, lokrang article marathi
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : वन्यजीवांवरील रोमांचक प्रकल्प