भारतीय अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी डॉ. शेखर बसू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आपल्या देशातील अत्यंत अवघड अशा पहिल्या अणुपाणबुडीला अणुउर्जा पुरवठा करणाऱ्या प्रकल्पाचे ते शिल्पकार आहेत. त्या पाणबुडीचे नाव आयएनएस अरिहंत असे आहे. त्यांना ११ महिने काम करण्याची संधी मिळणार आहे कारण त्या वेळी त्यांनी निवृत्तीचे वय गाठलेले असेल. सध्याचे प्रमुख डॉ. आर.के.सिन्हा हे २३ ऑक्टोबरला निवृत्त होत आहेत. बसू हे सध्या मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रात मुख्य प्रयोगशाळेचे संचालक आहेत.