जपानमध्ये मध्यावधी निवडणुकांनंतर यश मिळवलेल्या शिन्झो अ‍ॅबे यांना तेथील संसदेने पंतप्रधानपदी आरूढ केले आहे. ते पुन्हा पंतप्रधान होत असतानाच चीनने, राज्यघटना बदलाल तर याद राखा, असा इशारा जपानला दिला आहे.कनिष्ठ सभागृहात अ‍ॅबे यांच्या बाजूने ३२८ तर विरोधात ७३ मते पडली; नंतर वरिष्ठ सभागृहात अ‍ॅबे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्यांचे नवीन मंत्रिमंडळ असले तरी त्यात पूर्वीपेक्षा फार बदल केलेले नाहीत. तारो असो हे उपपंतप्रधान झाले असून अर्थ मंत्री किशिगा हे परराष्ट्र मंत्री, तर योईची मियावाझा हे उद्योग मंत्री झाले आहेत.