दिल्लीत चालत्या बसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराला बळी पडलेल्या पीडित तरुणीचा मृत्यूपूर्वीचा अंतिम जबाब तसेच या प्रकरणाशी संबंधित कनिष्ठ न्यायालयातील सर्व कागदपत्रे त्वरित सादर करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिल्ली पोलिसांना दिले. या प्रकरणातील चार आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. या खटल्यात पीडित युवतीचे मृत्युपूर्वीचा जबाब पुरेसा असताना या न्यायालयाने हस्तक्षेप करण्याची गरज नसल्याचे सांगत न्या. बी. एस. चौहान आणि जे चेलामनेश्वर यांच्या खंडपीठाने पुढील सुनावणीदरम्यान सर्व कागदपत्रे सादर करावीत,असे दिल्ली पोलिसांना सांगितले.
कनिष्ठ न्यायालयाने आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावल्याच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयाने कायम केल्यानंतर आरोपी पवन आणि मुकेश यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेश देत फाशीच्या शिक्षेबाबतचा निर्णय राखून ठेवला आहे.