राष्ट्रीय सुरक्षा संस्था म्हणजे एनएसएची माहिती उघड केल्याप्रकरणी आपण अमेरिकेत परत जाऊन तुरूंगवास भोगण्याची तयारी दर्शवली होती, असा गौप्यस्फोट एनएसएचा माजी कंत्राटदार एडवर्ड स्नोडेन याने म्हटले आहे. अमेरिकेत त्याने माहिती उघड केल्यानंतर तेथील प्रशासन विदेशात तसेच देशातील नागरिकांच्या दूरध्वनी व इतर माहितीवर कशी नजर ठेवीत आहे याची भांडाफोड करण्यात आली होती. त्यानंतर स्नोडेन हा रशियात पळून गेला व दोन वर्षे तो तेथे आहे. अमेरिकेने त्याच्यावर आरोप ठेवले तर त्याला तीस वर्षे तुरूंगात जावे लागणार आहे.