काटचाथीवू येथे मच्छीमारी करणाऱ्या पाच मच्छीमारांवर शनिवारी श्रीलंकेच्या नौदल अधिकाऱ्यांनी हल्ला चढविला, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
सदर अधिकारी पाच बोटींमधून आले होते आणि त्यांनी हवेत गोळीबाराच्या चार फैरी झाडल्या. या क्षेत्रात मच्छीमारी करू नये, अशी धमकीही या अधिकाऱ्यांनी मच्छीमारांच्या या गटाला दिली. इतकेच नव्हे तर एका बोटीवरील पाच मच्छीमारांवर अधिकाऱ्यांनी लोखंडी सळ्यांनी हल्ला केला.
नौदलाच्या अधिकाऱ्यांनी काही मच्छीमारांच्या जाळ्यांचेही नुकसान केले. अधिकाऱ्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या कानी आणि कलाईनानम या मच्छीमारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.