तेलंगणाबाबत पंतप्रधानांनी केंद्राची भूमिका स्पष्ट करावी – राजनाथसिंह

स्वतंत्र तेलंगणा राज्याबाबत काँग्रेसने एक महिन्याची ‘अल्टीमेटम’ देऊनहीकुठलाच निर्णय घेतला नाही. त्यामुळे पंतप्रधान मनमोहन

प्रतिनिधी, नागपूर | January 28, 2013 05:15 am

स्वतंत्र तेलंगणा राज्याबाबत काँग्रेसने एक महिन्याची ‘अल्टीमेटम’ देऊनहीकुठलाच निर्णय घेतला नाही. त्यामुळे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी तेलंगणाच्या मुद्यावर केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंग यांनी केली.
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजनाथसिंग यांची निवड झाल्यानंतर ब्रम्हपुरीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने ते नागपुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. स्वतंत्र तेलंगणा राज्याबाबत भारतीय जनता पक्ष गेल्या २५ वर्षांपासून आंदोलन करीत आहे. लोकसभेत तेलंगणाच्या मुद्यावर चर्चा होत असताना पक्षाने त्याला पाठिंबा दिला मात्र, काँग्रेसची भूमिका निश्चित नसल्यामुळे या विषयावर टोलवाटोलवी सुरू आहे. भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यावर स्वतंत्र तेलंगणाबाबत निश्चित विचार करेल, अशी घोषणा राजनाथसिंग यांनी केली.

First Published on January 28, 2013 5:15 am

Web Title: telangana protests continue bjp wants pm to speak
टॅग: Bjp,Telangana-protests