उत्तर अफगाणिस्तानात तालिबानच्या हल्ल्यात २१ जण मारले गेले असून येथील स्थिती बिकट होत चालल्याचे हे संकेत आहेत. अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने सांगितले की, काल सायंकाळी कुंडुझ प्रांतात खानाबाद येथे जे लोक मारले गेले ते नागरिक होते. तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी घेतली असून काबूलमध्ये काल झालेल्या बॉम्बस्फोटात किमान ५१ जण ठार झाले होते.