झरदारींचे प्रशस्त खासगी निवासस्थान पूर्णत्वाच्या मार्गावर

पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी यांचे प्रशस्त खासगी निवासस्थान पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या शाही

पीटीआय, लाहोर | February 7, 2013 08:01 am

पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी यांचे प्रशस्त खासगी निवासस्थान पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या शाही निवासस्थानाच्या परिसरात छोटी विमाने उतरण्यासाठी धावपट्टी तयार करण्यात आली असून बॉम्बस्फोटातही टिकून राहील अशी इमारत बांधण्यात येत आहे.
बाहरिया शहरातील या प्रशस्त निवासस्थानाला झरदारी यांचे पुत्र बिलावल यांचे नाव देण्यात येणार आहे. ‘बिलावल हाऊस’ असे त्याचे नामकरण करण्यात येणार आहे. पाकिस्तानातील एक बडे जमीनदार असलेल्या मलिक रियाज हुसेन यांनी झरदारी यांना हा प्रशस्त प्रासाद भेट केला आहे, असे पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर स्पष्ट केले.
या प्रसादाच्या सभोवताली हिरवळ असून तेथे १० हजार लोक जमू शकतील इतकी त्याची क्षमता आहे आणि खासगी विमानांसाठी धावपट्टीही तयार करण्यात आली आहे. या प्रासादाभोवती उंच भिंतीचे कुंपण असून त्यावर सुरक्षेसाठी साधनेही बसविण्यात आली आहेत.

First Published on February 7, 2013 8:01 am

Web Title: zardaris sprawling home is bulletproof with a runway to boot
टॅग: Bulletproof,Zardari