साहित्य :

दूध – ५०० मिली
मिल्कमेड -१ टिन
काजूची पूड – दोन चमचे
काजू व बदाम काप – दोन चमचे
मखाणा पूड – दोन चमचे
कॉर्नफ्लेक्स – दोन चमचे
किसलेला खवा – १५० ग्रॅम

कृती :

१) एका भांडय़ात दूध व मिल्कमेड एकत्र करून घ्यावे व मध्यम आचेवर गॅसवर ठेवावे.

२) एक उकळी आल्यावर त्यात खवा व काजूची पूड घालून मिश्रण ढवळून घ्यावे. लहान आचेवर ५-७ मिनिटांकरिता मिश्रण शिजवावे.

३) त्यात कॉर्नफ्लेक्स व मखाणा पूड घालावी व एकत्र करावे.

४) ताटलीला तूप लावून घ्यावे व तयार मिश्रण सर्व बाजूंनी एकसारखे करून पसरवून घ्यावे.

५) गरम असतानाच त्यावर काजू – बदामाचे पातळ काप पसरवावे.

 

नीलेश लिमये