मर्सिडिझ बेन्झने प्रथमच एएमजी श्रेणीतील प्रशस्त आणि आरामदायी एसयूव्ही भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. मर्सिडिझ बेन्झ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक एबरहार्ड कार्न यांच्या हस्ते या एसयूव्हीचे मंगळवारी मुंबईत लाँचिंग झाले. अत्याधुनिक सुखसोयींसह नवनवीन तंत्रज्ञानयुक्त या एसयूव्हीची किंमत एक कोटी ६६ लाख रुपये (एक्स शो रूम किंमत, मुंबई) आहे.