dr01आरटीओ.. अर्थात प्रादेशिक परिवहन कार्यालय. फक्त लायसन्सच्या निमित्तानेच अनेकांचा या कार्यालयाशी संबंध येतो. मात्र लायसन्स देणे किंवा वाहनांना क्रमांक देणे वगरे एवढेच या कार्यालयाचे काम नाही. अनेकार्थाने हे कार्यालय वाहनचालकांच्या, वाहनांच्या पर्यायाने रस्त्यावरील वाहतुकीच्या दैनंदिन घडामोडींशी जोडलेले असते. काय आहे आरटीओचे अंतरंग. कसे चालते येथील कामकाज, याची माहिती देणारे सदर.
आरटीओचे पूर्ण रूप आहे रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस. प्रादेशिक परिवहन कार्यालयाला मोटार वाहन विभाग असेही नाव आहे. या विभागाचे प्रमुख परिवहन आयुक्त असतात. सध्या या पदावर महेश झगडे हे कार्यरत आहेत. परिवहन आयुक्त हे भारतीय प्रशासकीय सेवांचे अधिकारी असतात. लोकांचा सर्वसाधारणपणे असा समज असतो, की रस्त्यावरील वाहतुकीचे नियंत्रण करणारे कर्मचारी म्हणजे आरटीओ. तसेच गाडी चुकीच्या ठिकाणी पार्क केली, लायसन्स नसेल किंवा तत्सम कोणत्याही कारणामुळे गाडी जप्त झाली, तर ती गाडी टोइंग करून नेणारे कर्मचारी म्हणजे आरटीओ. मात्र प्रत्यक्षात असे नाही. ही दोन्ही कामे करणारे कर्मचारी पोलीस खात्याच्या वाहतूक शाखेचे कर्मचारी असतात. आरटीओतील सर्वात कनिष्ठ गणवेशधारी कर्मचाऱ्याचे पदनाम सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक असे असते. त्याचा गणवेश साधारणत पोलीस उपनिरीक्षकाच्या गणवेशाशी मिळताजुळता असतो. पांढरा शर्ट आणि खाकी पँट हा गणवेश आरटीओ कर्मचाऱ्यांचा नसतो. आरटीओ कर्मचाऱ्यांची मुख्य कामे म्हणजे, वाहनाची तपासणी करणे, वाहनांची नोंदणी व या वाहनांपकी व्यावसायिक वाहनांना परवाना देणे, वाहन चालविण्यासाठी शिकाऊ तसेच कायम लायसन्ससाठी परीक्षा घेणे, व्यावसायिक वाहनांची वार्षकि तपासणी करणे, वाहनांचा कर, शुल्क आणि दंड वसूल करणे ही आहेत. मोटार वाहन विभागाचा वार्षकि महसूल ६००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी किमान सामान्यपणे एक आरटीओ कार्यालय असते. मुंबई शहरासाठी चार आरटीओ कार्यालये आहेत.
ऑटो रिक्षा : मुंबई १८००-२२०१८०, ठाणे १८००-२२५३३५
आरसी पुस्तक, लायसेन्स स्मार्ट कार्ड मिळालेले नाही अशी तक्रार असल्यास किंवा कोणतेही काम अडवले आहे अशी तक्रार असल्यास ई-मेल करावा.
संजय डोळे,  उप प्रादेशिक परिवहन अधिकारी
ई-मेल : ताडदेव : mh01@mahatranscom.in
अंधेरी : mh02@mahatranscom.in
वडाळा : mh03@mahatranscom.in

Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
Traffic changes in Divisional Commissioner office area due to show of force by candidates Pune news
उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनामुळे विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात वाहतूक बदल… काय आहेत बदल?
Best Coworking Spaces in Pune
कार्यालयीन जागा सहकार्यात पुणे देशात आघाडीवर
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”