स्पोर्ट्स बाइकचे प्रचंड वेड तरुणाईला आहे. तरुणाईचा हा कल लक्षात घेऊन बाइक निर्मात्यांनीही आता परवडू शकणाऱ्या स्पोर्ट्स बाइकची
निर्मिती करायला सुरुवात केली आहे..

आपल्याकडेही स्पोर्ट्स बाइक असावी, याकरिता युवा वर्ग सतत धडपडत असतो. कधी आपल्या जुन्या बाइकला मॉडिफाय करून तिला स्पोर्ट्स लुक देतो, तर कधी सायलेन्सर किंवा फिल्टर काढून कर्कश आवाज काढणारी बाइक बनवतो. भारतातील युवा वर्गाची हीच क्रेझ लक्षात घेता गेल्या काही वर्षांपासून बाजारात स्पोर्ट्स बाइक्सची चंगळ वाढली आहे. यामध्ये टीव्हीएसची अपाचे, यमाहाची फिजर, हिरोची करिझ्मा, बजाजच्या पल्सर या आणि अशा अनेक स्पोर्ट्स बाइक्सनी मागील काही वर्षांत भारतीय युवकांना आकर्षित करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळेच खिशाला कात्री न लावता युवकांनी ही आवड जपण्यासाठी सर्वच कंपन्या धडपडत आहेत. २०१५ मध्ये सुझुकी, बजाज, हिरो, केटीएम या कंपन्यांनी स्वस्त आणि मस्त अशा बाइक बाजारात आणल्या आहेत. सर्वोत्तम सीसी, उत्कृष्ट मायलेज आणि स्टायलिश लुकच्या याच बाइक्सची ओळख करून घेऊ या..

सुझुकी जिक्सर एसएफ
२०१४ मध्ये सुझुकीच्या ‘जिक्सर १५५’ बाइकने सर्वाधिक पुरस्कार जिंकून भारतीय बाजारात राज्य केले. जिक्सरची हीच लोकप्रियता अधिक वाढावी याकरिता जिक्सर एसएफ ही आवृत्ती बाजारात आणण्याचा निर्णय उद्योजकांनी केली. आकर्षक लुक आणि उत्तम मायलेज देणाऱ्या या बाइकला अद्याप बाजारात हवा तसा प्रतिसाद मिळाला नसला तरी ही बाइक सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे. .

वैशिष्टय़े
प्रकार :        ४ स्ट्रोक इंजिन,
                   १ सिलेंडर,
                   एअर कुलर
सीसी :         १५० सीसी
ब्रेक :        सिंगल डिस्क
वजन :        १३९ किलो
इंधन क्षमता :    १२ लिटर
किंमत :     ९९२३८ रुपये
        एक्स शोरूम

पल्सर आरएस २००
ही बहुप्रतीक्षित बाइक भारतीय बाजारपेठेवर राज्य करण्यासाठी सज्ज झाली आहे. पल्सर आवृत्तीतील सर्वात जलद धावणारी बाइक अशी हिची ओळख आणि तसा दावाही उत्पादकांकडून करण्यात आला आहे. याचे इंजिन पल्सर २०० एनएस या आवृत्तीचेच आहे. ज्या युवा वर्गाला पेअरिंग बाइक्सची आवड आहे त्यांच्यासाठी पल्सर २०० आरएसचा सर्वोत्तम पर्याय आहे. मायलेजमध्ये यात थोडा तोटा जाणवतो.

वैशिष्टय़े
प्रकार :        ४ स्ट्रोक,
                  १ सिलेंडर लिक्विड
                 कुल, ट्रिपल स्पार्क
सीसी :        २००
ब्रेक :        ऑटो ब्रेक
वजन :        १६५ किलो
इंधन क्षमता :     १३ लिटर
किंमत :     ११८००० रुपये
 एक्स शोरूम

पल्सर अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स
बजाजने पल्सर या आवृत्तीची लोकप्रियता लक्षात घेत बाजारात अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स १५० आणि २०० सीसी या दोन बाइक्स बाजारात आणल्या आहेत. पल्सर २००सीसी बाइकप्रमाणे याही बाइकला पेअरिंग देण्यात आले आहे. पल्सर एएस १५० व २०० या बाइक्समध्ये सीसीवगळता फार बदल करण्याचे धाडस उत्पादकांनी केलेले नाही. मायलेजबाबत बोलायचे झाल्यास १५० आणि २०० अनुक्रमे ४५ व ३० किलोमीटर प्रति लिटर अंतर कापेल असा दावा उत्पादकांकडून करण्यात येत आहे.

पल्सर एएस १५०
वैशिष्टय़े
प्रकार :        ट्म्विन स्पार्क डीटीएस-
        आय ४ वॉल्व, १ सिलेंडर
सीसी :        १५०
ब्रेक :        सिंगल डिस्क
वजन :        १४३ किलो
इंधन क्षमता :    १२ लिटर
किंमत :     ७९००० रुपये
एक्स शोरूम

पल्सर एएस २००
प्रकार :        ४ स्ट्रोक इंजिन,
                   लिक्विड कुल, १ सिलेंडर
सीसी :        २००
ब्रेक :        सिंगल डिस्क
वजन :        १५३ किलो
इंधन क्षमता :    १२ लिटर
किंमत :     ९१५५० रुपये
        एक्स शोरूम

स्वदेश घाणेकर – swadesh.ghanekar@expressindia.com