शासनातर्फे एलपीजी आणि सीएनजी इंधनाच्या वापरास प्रोत्साहन देण्यात येते. या इंधनाची किंमत पेट्रोल आणि डीझेलच्या किमतीपेक्षा कमी असते. या प्रकारचे स्वच्छ इंधन वापरणाऱ्या वाहनाला मोठी कर सवलत असते. एलपीजी कीट फीटिंग केल्यानंतर ते आरटीओ कार्यालयातून नोंदवणे गरजेचे असते.
आरटीओ कार्यालयात कीटची नोंद करण्यासाठी वाहन नेणे गरजेचे असते. त्याआधी कीट फिट करावयाचे आहे अशा अर्थाचा अर्ज ज्या कार्यालयात वाहनाची नोंदणी आहे त्या कार्यालयात नमुना बीटीमध्ये करणे गरजेचे असते. या अर्जासोबत शुल्क भरावयाचे असते. जर वाहनावर असलेल्या कर्जाची नोंद-नोंदणी पुस्तकामध्ये असेल तर त्या कर्जपुरवठादार संस्थेचे सदर बदलासाठी हरकत नसल्याचे प्रमाणपत्र गरजेचे आहे. या अर्जासोबत ज्या गॅरेजमध्ये फीटिंग करायचे आहे त्याच्या परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे मिळालेले प्रमाणपत्र तसेच जे किट फीट करणार आहे त्याचे टेिस्टग संस्थेचे मान्यतापत्र जोडावे. सदर संचिका एआरटीओ तपासतात, जर योग्य असेल तर बदलासाठी परवानगी दिली, असा शेरा बीटी फॉर्मवर देतात.
वाहन तपासणीसाठी मल्टिफंक्शन व्हॉल्वं तसेच सिलेंडरला कंट्रोलर ऑफ एकस्प्लोझिव्ह नागपूर यांचे योग्यता प्रमाणपत्र आहे काय? सिलेंडर योग्य क्षमतेचा आणि योग्य कोनात बसवला आहे काय? या बाबी तपासल्या जातात. तसेच वेपारायझर/ रेग्युलेटर , पेट्रोल, गॅस सोलेनायिड व्हॉल्वं, फीिलग कनेक्शन ,फ्युएल लाइन इत्यादी स्केचप्रमाणे आहे काय? चासिस क्रमांक, सिलेंडर क्रमांक, पेन्सिल िपट्र, हायड्रो टेस्ट मुदत या बाबी मोटार वाहन निरीक्षक तपासतात. योग्य असल्यास तसा शेरा मारून स्वाक्षरी करतात. त्यानंतर एआरटीओ तपासणी करून अंतिम स्वाक्षरी करतात. त्यानंतर नोंदणी पुस्तिकेमध्ये कीट क्रमांक, सिलेंडर क्रमांक, हायड्रो टेस्ट मुदत यांची नोंद केली जाते. या बाबीची नोंद अभिलेखात घेतली जाते. हायड्रो टेस्ट मुदत आधीच्या तपासणी दिनांकापासून तीन वर्षांची असते.
संजय डोळे,  उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे