12
कारमध्ये मिळणारी सुरक्षा तसेच बाइकची स्पीड यांना एकत्र करून बनलेली ही भन्नाट गाडी म्हणजेच सी१. दोनचाकी कार दिसत असली तरी अत्यंत आधुनिक जायरोस्कोपमुळे ती स्थिर राहते. डॅनिअल किम याने बनवलेली ही अमेरिकन गाडी इलेक्ट्रिकवर चालते. तिची टॉप स्पीड १६० असून तिची रेंज ३२० किमी आहे. या गाडीमध्ये साउंड सिस्टीम, सीट बेल्ट, एअर बॅग्स् असून दोन व्यक्ती आरामात बसू शकतात. या गाडीचे अनेक नमुने तयार झाले असून लवकरच उत्पादन सुरू होत आहे.

संदर्भ : <http://litmotors.com/c1/&gt;