मी एका सरकारी कंपनीत कामाला असून माझे वय ५० वष्रे आहे. वयाच्या ४५व्या वर्षी मी कार शिकण्याचे ठरवले. सुरुवातीला मी मित्राच्या गाडीवर शिकण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही जमेना. अखेरीस ड्रायिव्हग क्लासचा रस्ता धरला. अवघ्या महिनाभरातच मला हे तंत्र अवगत झाले. मात्र, खरं सांगू का, ड्रायिव्हग स्वतच शिकलेले केव्हाही चांगले. कारण ड्रायिव्हग क्लासमध्ये जेव्हा तुम्ही गाडी शिकण्यासाठी जाता त्यावेळी गाडीचे सर्व नियंत्रण शिकवणाऱ्याच्या हाती असते. त्यामुळे गाडी शिकण्याचा खरा आनंद घेताच येत नाही. परंतु फार काही तोशीस न करता लायसन्स मिळवायचे असेल तर ड्रायिव्हग क्लास जरूर लावावा, अर्थात हे माझे व्यक्तिगत मत आहे. असो. मी खऱ्या अर्थाने गाडी चालवायला शिकलो ते माझ्या स्वतच्या गाडीवर. गाडी तोडकीमोडकीच चालवता येत असतानाही मी गाडी खरेदी केली. अर्थात सेकंड हँड गाडी असल्यामुळे ते मला परवडण्यासारखे होते. बऱ्याचजणांनी मला वेडय़ात काढले. डोंबिवलीतील रस्त्यांवर गाडी चालवणे म्हणजे दिव्य असते वगरे टोमणे मारून मला गाडी घेण्याच्या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र, मी गाडी घेऊन ती चालवायला शिकलो. ड्रायिव्हग क्लासचा थोडा का होईना, उपयोग झाला. मात्र, गर्दीच्या ठिकाणांवर, हायवेवर गाडी कशी हाकावी याचे स्वप्रशिक्षण मी माझ्या जुन्या गाडीवरच पूर्ण केले. एकदा एका रिक्षावाल्याच्या अंगावरच गाडी घातली. मात्र, त्याचे व माझेही फारसे काही नुकसान झाले नाही. थोडीफार बोलाचाली झाली आणि माझी त्या प्रसंगातून सुटका झाली. तेव्हापासून मी काळजीपूर्वक गाडी चालवतो. आता तर मी जगातल्या कोणत्याही रस्त्यावर गाडी चांगली चालवू शकतो, एवढा आत्मविश्वास आला आहे. नव्या वर्षांत नवी गाडी घेण्याचा मानस आहे.
-नितीन परुळेकर, डोंबिवली.

dr11ड्रायिव्हिंग  शिकणं हा एक भन्नाट अनुभव असतो. शिकताना अनेकदा मजेशीर अनुभव येतात. काही अनुभव गंभीर असतात. शिकण्याच्या या प्रक्रियेतून तावूनसुलाखून बाहेर पडल्यानंतर मिळालेले ड्रायिव्हग लायसन्स अनोखा आनंद देऊन जाते. तुमचा हा ड्रायिव्हग शिकण्याचा अनुभव कसा होता, शिकल्यानंतर तुम्ही लाँग ड्राइव्हला कुठे गेलात, काही अडचणी आल्या का, तुमचा फर्स्ट हँड अनुभव कसा होता, आता तुम्ही किती सफाईदारपणे गाडी चालवता.. थोडक्यात तुमची ‘कार’कीर्द कशी घडली, याची माहिती तुम्ही ‘लोकसत्ता’कडे शेअर करायची. सोबत कारबरोबरचा तुमचा फोटोही पाठवायचा. शब्दमर्यादा २००च असावी. मग टाका गीअर आठवणींचा.. मेल करताना त्यावर ‘माझी कारकीर्द’साठी असा उल्लेख अवश्य असावा.
माहिती मेल करा.. ls.driveit@gmail.com