पोटातलं पाणीही हलणार नाही, अशा लक्झरियस गाड्या हल्ली रस्त्यावर धावताना दिसतात. शिवाय यांची रचनाही राजेशाही थाटाची असते आणि एक खास अशा ब्रॅण्डची गाडी असली की शानोशौकतमध्येही वाढ होते. त्यामुळेच अ़नेकांना या अशा लक्झरियस गाड्यांचा मोह होतो. परंतु प्रत्येकवेळी त्यांची किंमत परवडणारी असतेच असे नाही. तरीही हौसेला मोल नसतेच. तर अशाच प्रकारातली आणखी एक लक्झरियस गाडी नुकतीच दाखल झाली आहे.. ऑडी ए३!

एन्ट्री लेव्हल सेगमेंटमध्ये अधिकाधिक गाड्या लाँच होत असतानाच ऑडीनेही या प्रकारात उडी घेत स्पर्धकांमध्ये धडकी भरवली आहे. ए३ ही एन्ट्री लेव्हलची आरामदायी सेडान लाँच करत ऑडीने एक प्रकारे या सेगमेंटमधील स्पर्धकांना इशाराच दिला आहे. मर्सडिीझ बेन्झ आणि बीएमडब्ल्यू हे खरे ऑडीचे खरे स्पर्धक आहेत. कारण ए३ सेडान ज्या किमतीत (एक्स शोरूम किंमत २३ लाख रुपये) उपलब्ध होणार आहे, त्याच किमतीत या दोन्ही ब्रॅण्डच्या हॅचबॅक प्रकारातल्या गाड्या बाजारात उपलब्ध आहेत. असो. मुद्दा असा आहे की, ऑडीची सेडान आणि तीही २३ लाखांत उपलब्ध होणे म्हणजे ऑडीप्रेमींसाठी पर्वणीच आहे.

अंतरंग आणि बारूप
ऑडीच्या आतापर्यंतच्या वाटचालीत सर्वात स्वस्त म्हणून गणल्या गेलेल्या ए3चे अंतरंग आणि बाह्यरूप सर्वोत्तम प्रकारातील आहे. या नवीन कॉम्पॅक्ट लक्झरी सेडानमध्ये बाय झेनॉनचे हेडलॅम्प्स देण्यात आले आहेत. शिवाय ढगाळ वातावरणात एलईडी लॅम्प्स आपोआप लागतील. १७ इंच उंचीचे एॅलॉय व्हील्स, सात इंचाचा डिस्प्ले असलेली मल्टीमीडिया इन्फोटेनमेंट सिस्टीम, हस्ताक्षर ओळखणारे टचपॅड, ऑटो ड्युएल झोन एअर कंडिशिनग, इलेक्ट्रिकली एॅडजस्ट करता येण्याजोगे पुढील सीट, गाडी पार्क करताना आवश्यक असलेला रिअर वू कॅमेरा, पॅनारॉमित सनरूफ आणि सात एअरबॅग्ज या अंतर्बाह्य सुविधा ए३ मध्ये देण्यात आल्या आहेत.

व्हेरिएंट्स
ए३ सेडान डिझेल व्हर्जन अ‍ॅट्रॅक्शन, प्रीमियम, प्रीमियम प्लस आणि टेक्नॉलॉजी या प्रकारांत उपलब्ध आहे. तर पेट्रोल व्हर्जन फक्त प्रीमियम प्लस ट्रिममध्येच उपलब्ध आहे.

इंजिन
पेट्रोल ऑडी ए३ सेडानला १.८ लिटर, फोर सििलडर, टबरेचाज्र्ड इंजिन असून त्याची शक्ती १८२.५ पीएस आहे. १२५० ते पाच हजार या ताकदीचा आरपीएम या गाडीचा असेल. सात स्पीड डबल क्लच ऑटोमॅटिक गीअरबॉक्सही यात देण्यात आला आहे. डिझेल ऑडीला दोन लिटरचे टबरेचार्ज आहे.

मायलेज
– डिझेल व्हर्जनसाठी २०.३८ किमी प्रतिलिटर
– पेट्रोल व्हर्जनसाठी १६.६० किमी प्रतिलिटर

किंमत
डिझेल : ’ एॅट्रॅक्शन – २२.९५ लाख,
– प्रीमियम – २५.९५ लाख
– प्रीमियम प्लस – २९.९५ लाख
– टेक्नॉलॉजी पॅक – ३३.६६ लाख
पेट्रोल : प्रीमियम प्लस – २८.९५ लाख (सर्व किमती एक्स शोरूम आहेत.)