फोर व्हीलर घेण्याचा आनंद काही वेगळाच असतो. आम्ही जेव्हा टोयोटा लिवा घेतली तेव्हा आमचाही आनंद गगनात मावेनासा झाला होता. गाडी चालवता यायला हवी, असे मला मनापासून वाटायचे. पतिराजांनीही त्यात साथ दिली. ड्रायिव्हग स्कूल जॉइन केले. तसेच भावाबरोबर त्याच्या गाडीवरही ड्रायिव्हग शिकायला सुरुवात केली. गच्च गर्दीने भरलेल्या बीडच्या मंडईतून जेव्हा गाडी चालवता आली, त्या वेळी तर मला एवढा आनंद झाला की, आता मी जगातल्या कोणत्याही रस्त्यावर गाडी चालवू शकते, असा विश्वास वाटायला लागला. घाटातील वळणे, हायवेवरील ड्रायिव्हग यांच्यातील बारकावेही मग शिकून घेतले. एकदा ड्रायिव्हग शिकत असताना अचानक एक ट्रक आमच्या गाडीवर आला. मी गाडी पटकन रस्त्याच्या खाली घेतली, क्षणभर खूप भीती वाटली. मात्र, नंतर सावरले आणि त्यानंतर अधिकच काळजीने गाडी चालवू लागले.
गाडी शिकल्यानंतर मी प्रथम लाँग ड्राइव्हला गेले ते औरंगाबादला. औरंगाबादला जाण्यासाठी बीडहून सकाळी लवकरच निघालो आम्ही. सुरुवातीला दडपण होते. शिवाय रस्ताही खराब होता. नंतर थोडा आत्मविश्वास वाटला आणि गाडी मग ९०च्या स्पीडने पळवायला सुरुवात केली. मात्र माझ्या दुर्दैवाने अचानक रस्त्यात एक खड्डा लागला. मी पटकन गाडीला ब्रेक लावला. एका क्षणात गाडी थांबली, तेव्हा खऱ्या अर्थाने पॉवर ब्रेकचा अनुभव आला. आमच्या सुदैवाने मागे कोणतेही वाहन नव्हते म्हणून वाचलो. नंतरचा प्रवास मात्र सुखाचा झाला. न चुकता गाडी चालवली. काíतकी पौर्णिमेला बीडहून िपपळवंडीला काíतक स्वामींच्या दर्शनासाठी गेलो असता घाट आणि वळणावळणाच्या रस्त्यावर ड्रायिव्हग करताना मजा वाटली. परतीच्या प्रवासात पेट्रोल इंडिकेटर अचानक पेट्रोल कमी असल्याचे दर्शवायला लागला. जवळपास कुठेही पेट्रोल पंपही नव्हता. घाट रस्ता, रात्रीची वेळ, त्यात पेट्रोल संपण्याची भीती या सर्व सावटाखाली आम्ही कसेबसे घरी पोहोचलो व सुटकेचा निश्वास टाकला. तेव्हापासून ठरवून टाकले, गाडी चालवताना अजिबात घाबरायचे नाही.. डरना मना है.
सीमा परदेशी,बीड

ड्रायिव्हिंग शिकणं हा एक भन्नाट अनुभव असतो. शिकताना अनेकदा मजेशीर अनुभव येतात. काही अनुभव गंभीर असतात. शिकण्याच्या या प्रक्रियेतून तावूनसुलाखून बाहेर पडल्यानंतर मिळालेले ड्रायिव्हिंग लायसन्स अनोखा आनंद देऊन जाते. तुमचा हा ड्रायिव्हग शिकण्याचा अनुभव कसा होता, शिकल्यानंतर तुम्ही लाँग ड्राइव्हला कुठे गेलात, काही अडचणी आल्या का, तुमचा फर्स्ट हँड अनुभव कसा होता, आता तुम्ही किती सफाईदारपणे गाडी चालवता.. थोडक्यात तुमची ‘कार’कीर्द कशी घडली, याची माहिती तुम्ही ‘लोकसत्ता’कडे शेअर करायची. सोबत कारबरोबरचा तुमचा फोटोही पाठवायचा. शब्दमर्यादा २००च असावी. मग टाका गीअर आठवणींचा.. मेल करताना त्यावर ‘माझी कारकीर्द’साठी असा उल्लेख अवश्य असावा.
माहिती मेल करा.. ’.driveit@gmail.com