* मी व्यापारी आहे, मला व्यापारासाठी आणि घरी वापरण्यासाठी गाडी घ्यायची आहे, कोणती घेऊ?
– सागर पिलीवकर
उत्तर- घरी वापरण्याबरोबरच व्यवसायासाठीही तुम्हाला कार घ्यायची आहे. मात्र, असे करू नका. कारण दोन्ही ठिकाणच्या गरजा वेगवेगळ्या असतात. तरीही तुम्हाला या दोन्हीसाठी एकच गाडी घ्यायची असेल तर ओम्नी किंवा इको या गाडय़ा चांगला पर्याय ठरू शकतात.

* माझे वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपये आहे. मला वीकेंडला फिरायला जाण्यासाठी चांगली मायलेज असलेली आणि दिसायलाही आकर्षक असलेली अशी गाडी घ्यायची आहे. माझे बजेट साडेपाच लाखांचे आहे.
– सचिन कुल्ली
उत्तर- तुम्ही निसान मायक्रा अ‍ॅक्टिव्ह व ह्य़ुंदाई आय ट्वेंटी या गाडय़ांचा उल्लेख केला आहे. मात्र, या दोन्ही गाडय़ांचे टॉप मॉडेल तुमच्या बजेटबाहेर जाऊ शकते. बजेट फ्लेक्झिबल असेल तर वीकेंडसाठी या दोन्ही कार चांगल्या आहेत. रिट्झ हाही एक चांगला पर्याय आहे.

* माझ्या कुटुंबामध्ये सहा जण आहेत. माझ्याकडे जुनी अल्टो कार आहे. आणि नवीनमध्ये इनोवाचा विचार करतोय; परंतु तिचा मायलेज कमी आहे. चांगला पर्याय सुचवा.
– प्रसाद भूतकर
उत्तर- एसयूव्हीमध्ये तुम्हाला बरेच पर्याय सद्य:स्थितीत उपलब्ध आहेत. इनोवाबरोबरच स्कॉर्पिओ, इवालिया, एन्जॉय या गाडय़ा तर आहेतच शिवाय अर्टिगा, डस्टर, इकोस्पोर्ट, टेरानो या कॉम्पॅक्ट एसयूव्हीही आहेत. तसेच झायलो हाही एक चांगला पर्याय आहे. १२ लाखांपर्यंतच्या झायलोचा पर्याय चांगला वाटतो.

* इंधनस्नेही गाडी कोणती, जी मला जास्त मायलेज देऊ शकेल. माझे बजेट आठ लाख रुपये आहे.
– अर्चना पाध्ये
उत्तर- मायलेजच्या बाबतीत प्रत्येक कंपनीचा आपापला दावा असतो. तुम्हाला सेडान प्रकारातली पेट्रोलवर चालणारी गाडी तुमच्या बजेटमध्ये पाहिजे आहे. मग तुम्ही सेडानऐवजी कॉम्पॅक्ट एसयूव्हीचा का नाही विचार करत? त्यात तुम्हाला अर्टगिा, एन्जॉय, इकोस्पोर्ट, निस्सान टेरानो, डस्टर यांसारखे पर्याय उपलब्ध आहेत. या सर्वच गाडय़ा हायवेवर चांगले मायलेज देतात.

या सदरासाठी
तुमचे प्रश्न ls.driveit@gmail.com वर पाठवा.