माझी कार पिक अप घेताना स्मुथली चालत नाही. जर्क जाणवतो. – अंजली मोने, सांगली
गाडी सुरू होताना क्लच हळू सोडवा. म्हणजे पायाचा पेडलवर असलेला दाब हळूहळू कमी करावा. एकदम पेडल सोडू नये. म्हणजे जर्क बसत नाही. तरीही काही प्रमाणात जर्क जाणवत असेल तर क्लचला प्रॉब्लेम असू शकतो. क्लच प्लेटची असेम्ब्ली योग्य नसणे किंवा क्लच प्लेट खराब असणे ही कारणे असू शकतात. क्लच प्लेटला सुरक्षेसाठी लायिनग असतात. लायिनग मटेरिअल खराब असेल तर असे होऊ शकते. एंगेजमेंट आणि डिसएंगेजमेंट होण्यासाठी हे महत््तवाचे असते. क्लच प्लेट जर जळाली असेल तर रिप्लेस करा. गाडी चालवताना क्लच पेडलवर कंटिन्युअस पाय ठेवू नये. त्यामुळेसुद्धा क्लचला धोका निर्माण होऊ शकतो.

स्पार्क प्लगवर कार्बन जमा होतो. उपाय सांगा.
अनामिक
स्पार्क प्लगवर कार्बन जमा झाल्याने परफॉर्मन्सवर परिणाम होतो. इंधनाचे प्रमाण जास्त असलेले मिक्स्चर (रिच मिक्स्चर) इंजिनला पुरवले जाते. स्पार्क प्लगला हाय व्होल्टेज सप्लाय न होणे, कॉम्प्रेशन प्रेशर कमी असणे इत्यादी करणे असू शकतात. यावर उपाय म्हणजे स्पार्क प्लग इलेक्ट्रोडची योग्य सेटिंग करावी, व्होल्टेज पुरेसे मिळत नसेल तर इग्निशन कॉइल बदलावी. इंजिनवर जास्त लोड देऊन नये. कोल्ड स्पार्क प्लग वापरणे टाळावे. तसेच स्पार्क प्लगचा आणि ऑइलचा संपर्क येत नाही ना हे तपासावे. काबरेरेटरमध्ये योग्य प्रमाण सेट करावे.

कारला सस्पेन्शन प्रॉब्लेम आहे. धक्के जास्त लागतात. कार घेऊन सात वर्षे झाली आहेत. – निखिल सोमण, पुणे</strong>
कारमध्ये लीफ शॉक अबझोर्बर असेल तर या प्रकारातील काही इश्यू होऊ शकतात. या प्रकारच्या िस्प्रगमध्ये पट्टे असतात. आणि ते पट्टे वआकाराच्या बोल्टने एकत्र सांधलेले असतात. तो जर लूज असेल तर िस्प्रग योग्य रीतीने वर्क करणार नाही. तसेच या िस्प्रगला ग्रीसिंग रेगुलर करावे लागते. ते जर प्रॉपर नसेल तर पट्टे तुटू शकतात किंवा आवाज निर्माण होऊन पट्टय़ांची झीज होते. कारला नेहमीच जास्त लोड दिला जात असेल तर सस्पेन्शन सिस्टीममध्ये स्ट्रेसेस निर्माण होतात, म्हणून लेटेस्ट कार्समध्ये उच्च प्रतीची सस्पेन्शन सिस्टीम वापरतात.