माझ्याकडे मारुती ८००चे सीएनजी मॉडेल आहे. कार नवीन असताना चांगल्या प्रकारे मायलेज मिळत होता. परंतु आता हाच मायलेज निम्म्या स्वरूपात मिळतोय. मायलेज वाढवण्यासाठी काय करावे लागेल, कृपया सांगावे.
राजेश शिरसाट

*मारुती ८००चे सीएनजी मॉडेल खरे तर खूप छान आहे. थोडी काळजी घेण्याची गरज आहे. गॅसकीटमुळे गाडीला हा प्रॉब्लेम होऊ शकतो. इंधनाचे मिश्रण हा प्रमुख प्रॉब्लेम असू शकतो. गाडीच्या सीएनजी कीटमध्ये कालांतराने इंधन व हवेचे प्रमाण ऑप्टिमल न राहता बदलते. त्यामुळे मायलेजवर त्याचा परिणाम होऊ शकतो. तसेच कारच्या इंजिनाला शुद्ध हवेचा पुरवठा करणारे एअर फिल्टर कालांतराने बदलावे. या प्रकारच्या इंजिनची वेळोवेळी सव्र्हिसिंग करणे गरजेचे असते.
मयुर भंडारी

या सदरासाठी तुमचे प्रश्न bmayurm@gmail.com वर पाठवा.