dr01’मला नवीकोरी सात आसनी एमपीव्ही घ्यायची आहे. मी साधारणत: महिन्याला सुमारे ६०० किमी फिरतो. अर्टगिा, मोबिलिओ की डॅटसन गो प्लस याबाबत मला प्रचंड गोंधळ आहे. कोणती योग्य ठरेल कृपया सांगा.
– अशोक सोंडेकर
 ’डॅटसन गो प्लस ही जरी सात आसनी गाडी असली तरी ती कार आय२० एवढी आहे. त्यामुळे मागे फक्त दोन लहान मुलेच बसू शकतील आणि इंजिन, ग्राऊंड क्लीअरन्स, उंची या सर्व गोष्टीही एमपीव्हीला सहजपणे लागू होत नाहीत. ती एक साधीच कार आहे. मोबिलिओमध्ये जरा जास्त स्पेस आहे पण उंचीने जरा कमी असल्याने सीटची उंचीही कमीच आहे. त्यामुळे एसयूव्हीचा आनंद नाही मिळत. अर्टगिा किंवा शेवरोले एन्जॉय पेट्रोल व्हर्जन या स्पेशिअस आणि उत्तम गाडय़ा आहेत.
 ’मी आपले लेख नियमित वाचतो, त्यामुळे मला आता कारबद्दल बरीच माहिती झाली आहे. मला नवीन कार घ्यायची आहे, त्यासाठी मारुती सेलेरिओ पाच जणांच्या कुटुंबासाठी योग्य आहे का? या शिवाय इतर पर्याय सुचवा
– नारायण जगताप
 ’धन्यवाद. होय, मारुती सेलेरिओ पाच जणांसाठी नक्कीच योग्य आहे आणि उत्तमही आहेच. पण पर्याय म्हणून ग्रॅण्ड आय१० ही उत्तम आहे. कारण ती गाडी हेवी आहे. मारुती रित्झ, डॅटसन गो याही चांगल्या गाडय़ा आहेत. यापकी कोणतीही कार घ्या, काहीच हरकत नाही.
 ’माझे बजेट सहा लाख रुपये आहे. माझ्या कुटुंबात पाच जण आहेत आणि माझा रोजचा प्रवास साधारण ३० किमीचा आहे. मला डिझेलची कार नवीन घ्यायची आहे. तरी मला गाडय़ा सुचवा.
– सुनील खरमाटे
 ’सहा लाखांमध्ये डिझेल गाडी म्हणजे फक्त ग्रॅण्ड आय१० सीआरडीआय हीच येते. किंवा रित्झही तुम्ही घेऊ शकता. या दोन्ही गाडय़ांचा मायलेज २० किमी प्रतिलिटर आहे आणि उत्कृष्टही आहे. पण जर तुम्ही बजेट वाढवलेत तर डिझायर हाही एक चांगला पर्याय उपलब्ध होऊ शकतो. पण ग्रॅण्ड आय१० किंवा रित्झ पुरेशा आहेत. यात १.१ आणि १.३ असे इंजिन त्यांच्यात असल्याने अतिशय कमी मेन्टेनन्स असतो आणि इंजिनांचा आवाजही फारसा होत नाही. रित्झचा आकार आवडत नसेल तर ग्रॅण्ड आय१० घेऊ शकता. ती नवीनच आहे.
 ’मला सेडान प्रकारातील गाडी घ्यायची आहे. माझे बजेट दहा लाख रुपये आहे. मला कोणती गाडी अधिक चांगली ठरू शकेल. तसेच ती इंधनस्नेहीही असावी, अशी अपेक्षा आहे.
– संकेत प्रभुणे
 ’तुम्हाला डिझेल कार घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच फियाट लिनियाला पसंती द्या. ती अत्यंत चांगली गाडी असून तिच्या डिझेल इंजिनाची ताकद १२४८ सीसी एवढी आहे. पेट्रोल कारसाठी तुम्हाला नवीन होंडा सिटी बेस्ट आहे. मात्र, तिला सहा महिन्यांचे वेटिंग आहे. तुम्हाला तातडीने सेडान घ्यायची असेल तर मग मारुतीची सीआझही आहे. शिवाय फोर्ड फिएस्टा किंवा स्कोडा रॅपिड हेही पर्याय आहेत. यापकी स्कोडा रॅपिड ही उपयुक्त ठरू शकेल.
समीर ओक