dr01* सर, माझ्याकडे वॅगन आर व्हीएक्सआय मॉडेल आहे. मी माझ्या कारला एलपीजी किट जोडू इच्छितो. एलपीजी किट जोडले तर काही अडचण येईल का? कृपया सल्ला द्या. माझी कार दरमहा किमान एक हजार किमी फिरते.
– डॉ. तेजेश हांगे, बावडा
* सर, तुम्ही कुठे राहता त्यावर हे अवलंबून आहे. जर तुमच्या शहरात सीएनजी मिळत असेल तर तुम्ही सीएनजी लावावे अन्यथा एलपीजी उपलब्ध असल्यास तुम्ही नक्कीच लावू शकता. एलपीजी ३९ रुपये प्रति किलो आहे आणि त्यामुळे साधारण १४ किमीचा मायलेज मिळतो. एलपीजीने काहीच नुकसान होत नाही. फक्त बूट स्पेस वापरली जाते. आणि वजनही वाढते. बाकी तुमची मासिक बचत एक हजार ३०० रुपयांपर्यंत होईल. यंदाच्या वर्षी एलपीजीच्या किमती कमी झाल्यात त्यामुळे लाभ घ्या.
* सर मला शेवरोले एन्जॉयविषयी माहिती हवी आहे. मला ही गाडी खूप आवडते, मात्र ती घ्यावी की न घ्यावी याविषयी साशंकता आहे. कृपया मार्गदर्शन करा.
– गजानन घोरपडे, लातूर
 * मी स्वत: शेवरोले एन्जॉय चालवतो. ही गाडी अर्टगिापेक्षा स्वस्त आहे आणि हिच्यात स्पेसही चांगली आहे. रीअर व्हील ड्राइव्ह असल्याने ही गाडी कितीही वजन वाहून नेऊ शकते. नऊ लोकांचा भार आरामात ही गाडी पेलते. माझ्याकडे या गाडीचे पेट्रोल व्हर्जन आहे. मात्र, तिचा मायलेज १२ किमी प्रतिलिटर आहे. तर डिझेल व्हर्जनची गाडी १६ किमी प्रतिलिटर एवढा मायलेज देते. एन्जॉय ही गाडी वजनदार आहे. फक्त  सíव्हस सेंटर कुठे आहे, याची चौकशी करा आणि मग निर्णय घ्या.
* मी शेतकरी आहे. मला शेतमाल वाहून नेण्याबरोबरच कुटुंबीयांसाठीही उपयुक्त ठरू शकेल अशी गाडी सुचवा.
    – संदीप थेटे, नाशिक
* शेतमाल आणि वजनदार अवजारे वाहून नेण्यासारखी गाडी म्हणजे मारुती इको. जर बजेट जास्त असेल तर नक्की टाटा झेनॉन हा उत्तम पर्याय ठरू शकतो. मिहद्रा जिनीओ हीसुद्धा चांगली गाडी असून तिचाही विचार करायला हरकत नाही.
* मी नवउद्योजक असून मला बिझनेस मीटिंगसाठी बाहेरगावी जावे लागते. अशा वेळी कोणती गाडी जास्त उपयुक्त ठरू शकते. स्टेट्स सिम्बॉल म्हणूनही कोणती गाडी घेणे जास्त सयुक्तिक ठरेल.
       -शैलेश जाधव, नांदुरा
* सर, तुम्ही तुमचे बजेट सांगितले असते तर बरे झाले असते. स्टेट्स सिम्बॉलसाठी सेडान किंवा एसयूव्ही गाडी घ्यावी आणि त्यातही डिझेल व्हर्जन घ्यावे. सध्या सेडान प्रकारांत फोर्ड क्लासिक टीडीसीआय ही चांगली गाडी आहे. तिची किंमत सात लाख रुपये आहे. जर बजेट असेल तर फियाट लिनिया, स्कोडा रॅपिड, रेनॉ डस्टर, निस्सान सनी या गाडय़ांचाही विचार करावा. या गाडय़ा १०-११ लाखांपर्यंत मिळू शकतात.
समीर ओक
या सदरासाठी तुमचे प्रश्न ls.driveit@gmail.com वर पाठवा.