तुमच्या बाइकविषयीच्या आठवणी आम्हाला कळवायच्या. त्या आम्ही शब्दबद्ध करून ‘ड्राइव्ह इट’ पानावर प्रसिद्ध करू. सोबत तुमचा व बाइकचा फोटो असणे अत्यावश्यक. ‘मी बाइकवेडा’ या सदरासाठी असा उल्लेख जरूर करा. मग, चला उचला लेखणी आणि मारा किक.. आठवणींना..! 
शब्दमर्यादा : २०० शब्द.

ई-पत्ता : vinay.upasani @expressindia.com

17ब्लॅक ब्युटी
व्यवसायाच्या निमित्ताने मला रोजच किमान ८० ते ९० किमी प्रवास करावा लागत असे. मोटारसायकल विकत घेण्याचा विचार केला तेव्हा गाडी नेमकी कोणती घ्यायची, याच्या विचारातच माझे दोन महिने गेले. तोपर्यंत हिरो होंडा स्प्लेंडर नुकतीच बाजारात दाखल झाली होती. १९९४ चा तो कालावधी होता. मला काळा रंग खूप प्रिय असल्याने मी त्याच रंगाच्या हिरो होंडा स्प्लेंडरला पसंती दिली. मात्र महिनाभर या रंगाची स्प्लेंडर शोरूममध्ये उपलब्ध नव्हती. अखेरीस जून ९४ मध्ये मला माझ्या पसंतीची गाडी मिळाली. गेली दोन दशके मी ही माझी ब्लॅक ब्युटी वापरतोय, मात्र एकदाही या गाडीने मला त्रास दिल्याचे आठवत नाही. १९९९ मधील प्रसंग मात्र मी विसरू शकत नाही. माझी गाडी आणि एसटी बस यांच्यात जोरदार टक्कर झाली. मात्र या अपघातात मी आश्चर्यकारकरीत्या बचावलो. गाडीवरील माझ्या प्रेमामुळेच मी बचावलो. गेल्या २० वर्षांत मी तीन लाख किमी प्रवास केला आहे, माझ्या लाडक्या बाइकवरून.
स्वामी रुद्रनाथ, नागपूर</p>