तुमच्या बाइकविषयीच्या आठवणी आम्हाला कळवायच्या. त्या आम्ही शब्दबद्ध करून ‘ड्राइव्ह इट’ पानावर प्रसिद्ध करू. सोबत तुमचा व बाइकचा फोटो असणे अत्यावश्यक.
‘मी बाइकवेडा’ या सदरासाठी असा उल्लेख जरूर करा. मग, चला उचला लेखणी
आणि मारा किक.. आठवणींना..!  
शब्दमर्यादा : २०० शब्द.
ई-पत्ता :  vinay.upasaniexpressindia.com

सूद.. द बाइक स्टार
माझे खरे नाव सुदर्शन, परंतु माझे सर्व मित्र मला सूद असेच म्हणतात. कारण माझ्या हटके बाइकस्टाइलमुळे मी मित्रपरिवारात ओळखला जातो. मला कोणी हॉलीवूड स्टार असेही संबोधतात. मला व्हिंटेज गाडय़ांचे खूप आकर्षण आहे. त्याच मला खूप आवडतात. मी एकटाच माझ्या गाडीवरून भटकंती करीत असतो. कारण कोणी माझ्या गाडीवर बसण्याची हिंमतच करीत नाही. मी सुरुवातीलाच चौथ्या गिअरला गाडी उचलतो. माझ्याकडे सध्या पॅशन प्रो ही गाडी आहे. पण माझी ड्रीम बाइक आहे, हायबुसा एक्स३आय ही १३०० सीसीची रेसिंग बाइक. येत्या दोन वर्षांत ती माझ्याकडे असेल. वेगळ्या लुकच्या बाइक मला खूप आवडतात. मी सध्या यूपीएससीचा अभ्यास करतो आहे. पुढे मोठा सरकारी अधिकारी झालो की शासकीय गाडीपेक्षा बाइकवर फिरायलाच मी प्राधान्य देणार आहे.

– सुदर्शन माखले