लहानपणापासूनच मी बाइकवेडा आहे. नववीत असताना हृतिक रोशन ब्रँड अ‍ॅम्बॅसिडर असलेल्या ‘करिझ्मा आर’ या बाइकच्या प्रेमातच पडलो. तेव्हाच ठरवलं बाइक घ्यायची तर ‘करिझ्मा आर’च. वयाची १८ वष्रे पूर्ण होईपर्यंत मी आजोबांची टीव्हीएस स्कूटी वापरायचो. नंतर मला बाइक घेण्याचा विषय घरी चालू झाला. तेव्हा मी सांगून टाकलं की, मला ‘करिझ्मा आर’च घ्यायची आहे. पण बाबांना माझ्यासाठी चांगली अ‍ॅव्हरेज देणारी बाइकच घ्यायची होती आणि तशी करिझ्माची किंमत महाग म्हणजे ९०,००० रु. होती. त्यामुळे करिझ्मा घेण्यास बाबांनी नकार दिला. अगदी याचवेळी कॉलेजमधून माझी फी रु. २५,००० मला फ्रीशिपमुळे परत मिळाली. मग आईची परवानगी काढून मी ते पसे बाइकसाठी ‘डाऊन पेमेंट’ भरले. व नंतरचे सगळे पसे बाबांनी भरले. मला माझी बाइक ११.११.१२ या तारखेला हवी होती पण, या तारखेला पांढऱ्या रंगाची एकही ‘करिझ्मा आर’ मिळणे शक्य नव्हते. पाच महिने वेटिंग असल्याचे सांगितले होते. मग, मी त्या शोरूममधील सगळे बुकिंग्ज बघितले. त्या बुकिंग लिस्टमधील तीन-चार लोकांना फोन लावून विचारलं की, ‘तुम्ही बाइक घेणार हे पक्के आहे का?’ पहिले दोघे जण हो म्हणाले आणि लकीली तिसरा ‘माझी पशांची अडचण आहे. मी बुक केलेली बाइक तुम्ही घ्या’ मग काय! मला खूप आनंद झाला. आणि माझी पांढरी करिझ्मा आर ११.११.१२ रोजी घरी आली. मला ११ नंबर खूप लकी आहे. माझी बर्थडेटही ११च आहे. त्यामुळे मी माझ्या बाइकचा नंबर ५११ असा घेतला.
माझी ‘करिझ्मा आर’सगळ्यांनाच खूप आवडली. आमचे सांगलीचे माजी उपमहापौर युवराज बावडेकर तर माझी बाइक चालवून भारावूनच गेले. आमच्या मामाच्या गावाकडील लोक नाव नसल्याने तिला ‘करिश्मा’ म्हणत. बाइक घेतल्यानंतर पाच-सहा दिवसांनंतर मी असाच बाहेर गेलो असताना एक लहान मुलगा अचानक रस्त्यावर आडवा आला. त्या मुलाला चुकवायला जाऊन मी बाइकवरून खूप जोरात पडलो. नशिबाने मला जास्त लागलं नाही, पण माझ्या करिझ्माचे खूप नुकसान झाले. नंबरप्लेटसुद्धा न लावलेली अशी नवी कोरी माझी बाइक पडली व तिला लागले याचे मला खूप वाईट वाटले. आणि आजही वाटते. या घटनेबद्दल बाबा काही बोलले नाहीत पण आई खूप बोलली. त्यानंतर इन्शुरन्स क्लेम करून चार-पाच दिवस शोरूममध्ये येरझाऱ्या घालून मी माझी करिझ्मा पूर्ववत करून घेतली. पण त्यानंतर आजपर्यंत गेल्या सव्वा वर्षांत मी माझ्या करिझ्माला एक ओरखडाही पडू दिलेला  नाही. मी तिला फार जपतो.

मी बाइकवेडा..
तुमच्या बाइकविषयीच्या आठवणी आम्हाला कळवायच्या. त्या आम्ही शब्दबद्ध करून ‘ड्राइव्ह इट’ पानावर प्रसिद्ध करू. सोबत तुमचा व बाइकचा फोटो असणे अत्यावश्यक. ‘मी बाइकवेडा’ या सदरासाठी असा उल्लेख जरूर करा. मग, चला उचला लेखणी आणि मारा किक.. आठवणींना..! शब्दमर्यादा : २०० शब्द. ई-पत्ता : vinay.upasani @expressindia.com