टोयोटाच्या इनोव्हा आणि फॉच्र्युनर या दोन्ही गाडय़ांना प्रचंड मागणी आहे. रस्त्यावर दहापकी किमान चार गाडय़ा तरी इनोव्हा आणि फॉच्र्युनर असतात. या दोन्ही गाडय़ांची क्रेझ वाहनप्रेमींमध्ये आहे. ठाणे-मुंबईही त्याला अपवाद नाही. या पाश्र्वभूमीवर मिलेनियम टोयोटाच्या मुंबई व ठाण्यातील शोरूम्समध्ये इनोव्हा आणि फॉच्र्युनर या दोन्ही गाडय़ांची नवीन मॉडेल्स ठेवण्यात आली आहेत. ग्राहकांचा या दोन्ही गाडय़ांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नव्या इनोव्हामध्ये पुढील बाजूला ग्रिल, नवीन अलॉय व्हील्स, रीअर गाíनशेस अशी बाह्यरचना असून आतील भागात बसण्यासाठी लेदर सीट्स, स्टीअिरगला वूडन फिनििशग टच दिलेला, बसायला प्रशस्त जागा, बूट स्पेसही मोकळाढाकळा अशा प्रकारची वैशिष्टय़े आहेत. फॉच्र्युनर आता अ‍ॅटोमॅटिक स्वरूपातही उपलब्ध असून आतील रचनेत आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. सर्व इंटेरिअर काळ्या रंगात आणि त्यात लाकडीकाम अशी रचना आहे. त्यामुळे गाडीत बसणाऱ्याला एक वेगळीच अनुभूती येते. दोन्ही गाडय़ांमध्ये पुढील बाजूला एअरबॅग्ज आहेत. तसेच टच स्क्रीन सेट अप आणि ब्लू टूथ कनेक्टिव्हिटी या सुविधाही आहेत. मिलेनियम टोयोटाच्या पाचही शोरूम्समध्ये नव्या स्वरूपातील इनोव्हा आणि फॉच्र्युनर टेस्ट ड्राइव्हसाठी उपलब्ध आहेत.